भीमा तूच आमची शान हाय Bhima Tuch Aamchi Shaan Ahe Lyrics – Kadubai Kharat

Bhima Tuch Aamchi Shaan Ahe Lyrics by Kadubai Kharat

Bhima Tuch Aamchi Shaan Ahe Lyrics

तू हाय ज्ञानाचा पहाड… भीमा
वाघाची दहाड… भीमा
बांधून पुस्तकाले घर… भीमा
तोडलं अन्यायाचा गबाड… भीमा
माय बापा वानी प्रेम देल साऱ्याले समान
आज उंचावली स्वाभिमानाने ताट आमची मान
तू हाय ज्ञानाचा पहाड… भीमा
वाघाची दहाड… भीमा
बांधून पुस्तकाले घर… भीमा
तोडलं अन्यायाचा गबाड… भीमा
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तूया अभिमान हाय ।। धृ ।।

रॅप:
सदैव थाटात उभा
नमला ना कोणा समोर
शिक्षणाच्या जीवववर
दाखवला बुद्धीचा जोर
शब्दाचा पक्का
रुढीले धक्का
गुलामी तोडली सारी कठोर
मोडला मणका
वैर्याले दणका
छाती ठोकून आज तू गर्वाने बोल
जय भीम….
बुद्धाची शांती
भीमाची क्रांती
कमी आली या धर्तीवरती
सुखाचा थारा
भीमाचा नारा
बोलतो मी जोरात आवाज वरती
शिकून आज मोठ्या लेवल वर चालो
फुले, शाहू, आंबेडकर करतो follow
अंधश्रद्धेतून दूर पळालो
समतेच्या वाटेवर सारे वळालो

शिकण्या सावरण्या घडण्या भीम परदेशा हो गेला
डोळे पाणावले हर एकाचे जवा भीम माया आला
सूट बूट कोट भारी पडली ऐसी छाप
एंट्री रुबाबदार पडला वैर्याला थरकाप
तू हाय ज्ञानाचा पहाड… भीमा
वाघाची दहाड… भीमा
बांधून पुस्तकाले घर… भीमा
तोडलं अन्यायाचा गबाड… भीमा
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तूया अभिमान हाय ।। १ ।।

लख लखात्या ज्वाले वानी भीम होता हो अंगार
भले भले पडले फिके भीमा समोर भंगार
एक एक क्रांती जसा तलवारीचा घाव
समोर सारे झुकले काफी नाव भीमराव
तू हाय ज्ञानाचा पहाड… भीमा
वाघाची दहाड… भीमा
बांधून पुस्तकाले घर… भीमा
तोडलं अन्यायाचा गबाड… भीमा
भीमा भीमा तूच आमची शान हाय
पुऱ्या जगाले तूया अभिमान हाय ।। २ ।।

ये भी पढ़ें

close