Ugavala Tara Timir Hara Garja Shivaji Raja Lyrics In marathi by Subhash Kharmare is marathi song sung by Subhash Kharmare.
गिरशी खरी किरीटा परी
लहरी भगवा ध्वजा
उगवला तारा तिमिर हरा
गर्जा शिवाजी राजा || धृ ||
युगा युगाचा गडद अंधार
यौवन चाकरी करी सरदार
मराठा मर्द होऊन खुर्द
छाटल्या शत्रुच्या भुजा
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा || १ ||
तळपे हाती नंगी तलवार
होऊनी राणा कृष्ण बलस्वार
हर हर करी दरीकपारी
उधळल्या राजाच्या फौजा
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा || २ ||
भवानी आईचा कृपा वरद
निर्दयी खानाचा करुनी वध
कापुनी यौवना करीत दैना
मातीत मिळविल्या पैजा
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा || ३ ||
समरधुरंधर दिव्य प्रताप
निती ला घाबरले अनिताप
आश्रम देई संकेत न्याय
अंबेच्या रक्षेला लय
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा || ४ ||
|| प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ||