Shivrayanchya Killyanvar Lyrics – Shivjayanti Song

Shivrayanchya Killyanvar Lyrics is new Shivjayanti Song sung by Sharayu Date , Viraj Daki with music given by Sujit- Viraj while lyrics are written by Umesh jadhav.

Shivrayanchya Killyanvar Lyrics

दारी तुळस नांदते
माझ्या राजाची पुण्याई,
त्या काळोखाच्या राती
त्याने केली रोशणाई,

धन्य शहाजी राजे ग
धन्य माऊली जिजाई,
गड किल्ले स्वराज्याची
काय सांगू नवलाई,

राया शिवरायांच्या किल्ल्यांची
सफर देशील का,
मला दाऊनि शिवनेरी किल्ला
राया गडावर नेशील का,

राया शिवरायांच्या किल्ल्यांची
सफर देशील का,
मला दाऊनि शिवनेरी किल्ला
राया गडावर नेशील का,

मला दाखवा ना
ताम्हना कर्नाळा किल्ला,
जाऊ जोडीन गोडीन
पाहण्या तोरणा किल्ला,

लय भारी लय भारी
चरणी लागू देवाच्या
पाउलखुणा शिवरायांच्या,

शिवरायांच्या स्पर्शान
झाली हि धरणी पावन,
कुलाबा राजगड जीवधन
त्याचं हि घडवा दर्शन,

शिवरायांच्या स्पर्शान
झाली हि धरणी पावन,
कुलाबा राजगड जीवधन
त्याचं हि घडवा दर्शन,

राया विशाल गडाच विशालरूप
डोळे भरुनी पाहशील का,
या सिंहागडावरच्या सिंहाला
मुजरा मानाचा करशील का,

मला दाखवा ना
ताम्हना कर्नाळा किल्ला,
जाऊ जोडीन गोडीन
पाहण्या तोरणा किल्ला,

लय भारी लय भारी
चरणी लागू देवाच्या
पाउलखुणा शिवरायांच्या

तुला गड किल्ल्यांवर नेईन
स्वराज्याची दौलत दावीन,
तुला गड किल्ल्यांवर नेईन
स्वराज्याची दौलत दावीन,

शिवबा घडवला जिजाई न
त्यांची समाधी पाचड ला पाहीन,
राया रायगडावर चढताना
भगवा हातात घेशील का,

दरवर्षाला अभिषेकाला
मला गडावर नेशील का,

मला दाखवा ना
ताम्हना कर्नाळा किल्ला,
जाऊ जोडीन गोडीन
पाहण्या तोरणा किल्ला,

लय भारी लय भारी
चरणी लागू देवांच्या,
पाहून तुला काळीज हा
पाउलखुणा शिवरायांच्या.

ये भी पढ़ें

close