Shivgarjana Lyrics in Marathi | शिवगर्जना

Shivgarjana Lyrics in Marathi: Shiv Jayanti Shivgarjana Lyrics in Marathi (Chhatrapati Shivaji Maharaj)

Shivgarjana Lyrics in Marathi

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम

महाराsssssज

गडपती

गजअश्वपती

भूपती

प्रजापती

सुवर्णरत्नश्रीपती

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायालंकारमंडित

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

राजनितिधुरंधर

प्रौढप्रतापपुरंदर

क्षत्रियकुलावतंस

सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज

राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो

जाणून घ्या शिवगर्जनेचा मराठीमध्ये अर्थ-

गजअश्वपती- ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचे प्रतिक समजले जायचे. म्हणुन गजअश्वपती हा शब्द वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)

भूपती प्रजापती– वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण आणि पालन करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.

सुवर्णरत्नश्रीपती- राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे 32 मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)

अष्टावधानजागृत- आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.

अष्टप्रधानवेष्टीत- ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.

न्यायालंकारमंडीत- कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत- सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.

राजनितीधुरंधर– आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.

प्रौढप्रतापपुरंदर– मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.

क्षत्रियकुलावतंस– क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.

सिंहासनाधिश्वर– जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच 32 मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेकसाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले होते.

महाराजाधिराज- विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.

राजाशिवछत्रपती– ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

दरम्यान, महाराजांनी लष्करी कारभाराची व्यवस्था डोळसपणे आखली होती. त्यांचे स्वतःचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. महाराजांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर होता. शुद्ध मन, सद्भावना, सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष गुण होते. प्रजेच्या सुखाचा नेहमी विचार करणारा व दुःखाचा विनाश करणारा हा लोकनायक होता.

ये भी पढ़ें

close