SHARAN BUDDHALA AALI LYRICS – Anand Shinde

Sharan Buddhala Aali Lyrics by Anand Shinde is Buddha Paurnima Special,  Buddha Geete Marathi. song written by Pralhad Shinde, Rajas Jadhav.

Sharan Buddhala Aali Lyrics

ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली
ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

खरा धम्म तो सांगत सांगत,वैशालीस त्या येता तथागत
खरा धम्म तो सांगत सांगत,वैशालीस त्या येता तथागत
तथागतांचा प्रवचनात प्रजाही तल्लीन झाली
तथागतांचा प्रवचनात प्रजाही तल्लीन झाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

तथागतांचे लोण पसरले, आम्रपालीला लोक विसरले
तथागतांचे लोण पसरले, आम्रपालीला लोक विसरले
असे कसे है अघटित घडले मनाशी आपल्या म्हणाली
असे कसे है अघटित घडले मनाशी आपल्या म्हणाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

कुस्तदाशी ना तिला कळाले, ऋषीमुनी कोण्ही नगरीत आले
कुस्तदाशी ना तिला कळाले, ऋषीमुनी कोण्ही नगरीत आले
गोसावडे ते कोण कुठले पडताळाया निघाली
गोसावडे ते कोण कुठले पडताळाया निघाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

तया पाहता झाली मोहित,भोजनास त्या करून निमंत्रित
तया पाहता झाली मोहित,भोजनास त्या करून निमंत्रित
पाहावे कसे ना होतील अंकित येता रंग महाली
पाहावे कसे ना होतील अंकित येता रंग महाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

उरकून घेता राजसभोजन, आम्रपालीला म्हणती उद्धेशून
उरकून घेता राजसभोजन, आम्रपालीला म्हणती उद्धेशून
धन्य हो माते हि वाणी ऐकून लज्जेने मूर्च्छित झाली
धन्य हो माते हि वाणी ऐकून लज्जेने मूर्च्छित झाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली
ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली
त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

ये भी पढ़ें

close