सांगा शेती करू कशी Sanga Sheti Karu Kashi Lyrics – Marathi Rap

सांगा शेती करू कशी Sanga Sheti Karu Kashi Lyrics – Marathi Rap (Shetakari Song) is marathi song viral on social media.

Sanga Sheti Karu Kashi Lyrics

जनता सारी झोपली का ?
शेतकऱ्यावर कोपली का ?
आत्महत्येची कारणे त्याच्या
सांगा तुम्ही शोधली का ?
शोभली का तुम्हाला
भाकरी त्याचा कष्टाची ?
दोन रूपयाच्या भाजी साठी
वाद केला त्याच्याशी
चार घोट पानी पिऊन
खेटर घेतल उषाशी
पोशिंदा तो जगाचा आज
झोपला र उपाशी

सांगा शेती करु कशी ?
करु कशी ?
पोटाची खळगी भरु कशी ?
भरु कशी ? 4x

कांद्याला भाव नाय
उसाला भाव नाय
तुरीला भाव नाय
खाऊ काय ?
आलेल्या पैश्यात
उधारी दिली मि
सावकाराला
देऊ काय ?
पोराच्या शाळेची
फीस नाय भरली
पोराला घरिच
ठेऊ काय ?
एकच दिसतो
पर्याय आता
गळ्याला फास मी
लाऊ काय ?

व्यापाऱ्याची मनमानी
सरकारची आणिबानी
शान के साथ यांचा थाट
कष्टकऱ्याच्या डोळ्यात पानी
पानी कस शेताला देऊ
विज दिली रात्रिची
रात्रीच्या त्या काळोखात
भीति विंचु सापाची

सांगा शेती करु कशी ?
करु कशी ?
पोटाची खळगी भरु कशी ?
भरु कशी ? 2x

मेहनत करुन पिकवलेल्या
मालाला आमच्या कमी भाव
सरकार जरी बदलल तरी
कागदावरच हमी भाव
भेगा पडल्या धरणीमायला
दुष्काळी झाली परिस्थिति
सर्वे,दौरे खोटे सगळे
प्रचारासाठीची उपस्थिति
जीवाच्या पल्याड जपलेली
माझी सर्जा-राजा उपाशी
उपाशी त्यांना ठेऊन सांगा
भाकरी मी खाऊ कशी
प्रश्न माझा उत्तर दया
सांगा शेती करु कशी ?

सांगा शेती करु कशी ?
करु कशी ?
पोटाची खळगी भरु कशी ?
भरु कशी ? 4x

माझ्या मराठीसाठी,
जगाच्या पोशिंदयासाठी.

 

Credtis –
Artist/Lyrics: – Rapboss
Music: – Rapboss
Directed By: – Akshay Shinde
DOP & Edit By: – Akki Visuals & Datta Patil
Audio Mixing & Mastering: – Rapboss
Album Art By: – Sachin Burande

 

ये भी पढ़ें

close