Rajacha Rajpan Lyrics by Adarsh Shinde is new Shiv Jayanti song with music given by Utkarsh Shinde & Adarsh Shinde while lyrics are written by Utkarsh-Adarsh.
सह्याद्री मातीचा कण कण सदा हे गाणार
माझ्या राजाचं राजपण काल होतं आज ऊद्या ऱ्हाणार ।।धृ।।
मर्द मराठा राजा माझा
(जी र जी र जी जी जी)
जिकडं तिकडं गाजा वाजा
(जी र जी र जी जी जी)
हेच स्वराज्य, हेच राष्ट्र, हीच देतो ग्वाही
प्राण पणाला लाऊन लढला, राजा दिशा त्या दाही
नाद असा निनादे, राजा एकच साजे
या स्वराज्यासाठी,न्याय हक्कासाठी,
लढला सिंहासनाधीश्वर
माता जिजाऊचा, लेक तो जाणता,
प्रौढ़ प्रताप पुरंदर
तुझाच डंका जगात या दुमदुमणार
माझ्या राजाचं राजपण काल होतं आज ऊद्या ऱ्हाणार ।।१।।
हर हर हर महादेव बोला
(जी र जी र जी जी जी)
मुजरा करतो शूर वीरा
(जी र जी र जी जी जी)
वाघा समान आमचा राजा होता कर्दनकाळ
त्याची कीर्ती गाता गाता आवाज हा घुमणार
वीज जशी कडाडे, वैऱ्यावरी धडाडे
जरी आले मरण, जाणे नाही शरण,
अशी करारी ती तलवार
मर्दा लढून या जाती मातीसाठी
सौंस्कृतीची जपली धार ।।२।।
सह्याद्री मातीचा कण कण सदा हे गाणार
माझ्या राजाचं राजपण काल होतं आज ऊद्या ऱ्हाणार।।