भीमा कोरेगाव केले Bhima Koregaon Kele Lyrics – Adarsh Shinde

Bhima Koregaon Kele Lyrics by Adarsh Shinde is latest marathi song From album Bhimrao Ekach Raja music given by Utkarsh & Adarsh Shinde.

Bhima Koregaon Kele Lyrics

उसळत्या रक्ताचा पडिला प्रभाव
गाडीली ती पेशवाई केला वरमी घाव
इतिहासात अजरामर शूर महाराचे नाव
भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव

पेशाव्यांसाठी लढा वाढू द्या अमुची शान
तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जाणं
वदले महार काय देता आम्हा सन्मान
तुमच्या साठी लाऊ अमुचा पणाचा प्राण ….
अहंकाराने चिडला तो पेशव्यांचा बाजीराव
भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव

तुच्छ ही जात आहे तुमची अती शुद्राची
आस का धरता तुम्ही अमुच्या कडे मानाची
असला शूद्र तुम्ही, शूर जात ही अमुची
स्वनापारी होत नाही बरोबरी तुमची
अशी कर्मठ त्या कावळ्यांनी बघा केली कावकाव
भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव

इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात
स्फूर्ती देई आम्हा अमुच्या रक्तचं नात
धडकले संगरात लढण्या ते सिदानक
अठराशे अठरा साली दिला पेशव्या धाक
मान वंदनेला योद्ध्यांच्या येत माझे भीमराव
भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव

ये भी पढ़ें

close